२/२७/२०१६

जाणता अजाणता जुळले नातं


जाणता अजाणता जुळले नातं
जसं दवबिंदु अन् गवताचं पात
सहवास क्षणभराचा एवढीच खंत
पण तरीही विचार कोण करतंदवबिंदुच प्रेम पात्यापात्यावर ओघळतं
कधी अश्रुं तर कधी मोती होउन बरसतं
अलगदपणे येउन मातीत मिसळतं
बघुन हे पात्याचं मन करपतंजीवापाड जपलेलं नाते असे तुटतं
तेव्हा काय अन् कसे वाटतं
आठवणींच्या वेदनांनी मन कस झुरतं
हे ज्याने प्रेम केलंय त्यालाच कळतंविसरायचं म्हटले तरी कोण विसरतं
नाही म्हटलं तरी पुन्हा पुन्हा आठवतं
कारण प्रेमाच नातं हे असच असतं
प्रेम तर नाही,आयुष्य माञ संपत...!


कवी-गणेश साळुंखे...!

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search