२/१४/२०१६

प्रेम हे असच असत....प्रेम हे असच असत....

करताना ते कळत नसत आणि
केल्यावर ते उमगत नसत...
उमगल तरी समजत नसत 
पण आपल वेड मन आपलच ऐकत नसत...
प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते
ती फक्त त्या दोन जीवांनाच माहित असते.
लोक म्हणतात काय असत प्रेमात..
पण मी म्हणतो करून बघा एकदा..
काय नसत प्रेमात...?
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो
एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना
ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search