स्पर्श
होताच तुझ्या हाताचा,
माझं वेडं
मन बहरुन गेलं...
अन्
प्रितीचा ओलावा गंध,
हळूहळू उरात
पसरत गेलं...
माझ्या नजरेशी नजर मिलता,
डोळ्यातली धुंदी वाढत गेली...
अन् हरवलेले भान केवळ,
श्वास आमचे बोलत चालली...
तुझ्या केसातुनी हात फिरवत,
जरा तुला आपलसं केलं...
ओठाचा स्पर्श करताच माथ्याला,
हवेत गारवा पसरत गेलं...
लाजून जरा ती दूर गेली,
ह्दयातली आग भडकत चालली,
चुंबताच तिच्या गो-या पाठीला,
हळूच माझ्या कुशीत आली...
कळलचं नाही कसं कधी,
ओठात ओठ मिळून गेले...
अन् गुलाबी पाकळ्यांचा सुगंध,
ह्दयात माझा पसरत चालले...
उष्मागार श्वास बोलत होते,
ह्दयातली स्पंदने वाढत गेली...
अन् दोन क्षणांच्या खेळात,
दोन अनोळखी जीव एक झाली...