थोड सांगाव
थोड लपवाव,
अस प्रेम
असाव...........
थोड रुसवा
थोड हसव,
असा प्रेम
असाव..........
गुपचूप फोन
वर बोलाव
कोणाची नजर पडताच
पटकन "अगं" चा "अरे"
आणि "आरे" च अ"अगं" कराव,
असे प्रेम कराव........
कुठे भेटायला बोलवाव
पण आपण मात्र जाणून
उशिरा जाव
मग आपणच जाऊन
सोर्री म्हणाव,
असे प्रेम असाव......
वर वर त्याच्या /तिच्या वागनाची
खूप चेष्टा करावी,
पण तरीही तो / ती तुम्हाला
किती आवडते, हे जरूर
सांगाव,
असे प्रेम असाव...........
प्रेम हि एक सुंदर भावना हे
झरूर जाणाव पण
त्या बरोबर येणाऱ्या
वेदनांना हि समोर जाव
विरह येतील,
संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील
पण आपण मात्र खंबीर राहाव,
असे प्रेम असाव...............
अनेक संकट येऊनही
भेटायला जाव,
असे प्रेम असाव.............
एकदाच होत,
दोन मनाच मिलन
म्हणूनच जीवापाड
जपाव अस प्रेम असाव........