२/१९/२०१६

आज तुझी खूप आठवण आली..
आज तुझी खूप आठवण आली,

म्हणून मुद्दामच मोबाइल काढला,
तुझा जुना नंबर शोधून,
बंद असून सुद्धा एकदा तपासून
पहिला,
नंबर अन अवेलेबल दाखवत होता,
इथे श्वास सारखा फुलत होता,
का माहित नाही कसतरीच
झालेलं,
मनात सारखं काहीतरी चाल्लेल,
हो तिथेच गेलेलो मी,
जिथे पहिल्यांदा भेटलो होतो,
नजरेला नजरा देत,
एकत्र राहणार बोललो होतो,
तू मात्र निघून गेलीस,
पण मी माझ दिलेलं वचन पूर्ण
करतोय,
मी अजूनहि तुझी तिथेच वाट
पाहतोय,
तू गेल्यावरही तू जवळ
असल्याचा भास होतोय...


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search