४/१६/२०१६

तडका - ऊन्हाचे मोजमाप

ऊन्हाचे मोजमाप

सुर्य ओकतो आहे आग
जमीन भलती तापते आहे
जमीनीसह हवा देखील
ऊन्हाचे चटके भोगते आहे

परिस्थितीच्या गांभिर्याने
श्वासातील अंतर वाढू लागले
तापमापीने जागो-जागी
ऊन्हाचे सर्वे घडू लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३


टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search