४/०९/२०१६

भारतीयांचं सेक्स लाइफ इंटरेस्टिंगशहरात राहणारे भारतीय हे जगातील इतर कोणत्याही देशातील नागरिकांपेक्षा अधिक औत्सुक्यपूर्ण सेक्स लाइफजगतात. तर भारतीय प्रेमी जास्त मोकळ्या विचारांचे असल्याने ते पार्टनरबरोबर सेक्ससंबंधी मनमोकळेपणाने गप्पा मारतात अशी माहिती नव्याने करण्यात आलेल्या जागतिक सर्वेत समोर आली आहे. 


हा सर्वे २६ देशातील २६ हजार लोकांशी ऑनलाइन बोलून करण्यात आलेला आहे. त्यात सेक्ससंबंधातील महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा करण्यात आली आहे. या सर्वेनुसार ७४ टक्के लोकसंख्या ही आपल्या पार्टनरला बेडमध्ये आपल्याला काय हवं ते सहज सांगते. 

ब्रिटनमध्ये हे प्रमाण फक्त ४९ टक्के एवढेच आहे. भारतातील ६८ टक्के युगुलांना त्यांचे प्रेम एक्सायटिंग वाटते. ग्रीकांमध्ये हे प्रमाण ७६ टक्के आहे तर मेक्सिकन नागरिकांमध्ये हे प्रमाण ८० टक्के एवढे आहे. 

या सर्वेनुसार सेक्स करताना नव-नवीन प्रयोग करण्यात भारतीय बिनधास्त असतात. यासाठी ते वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. त्यानुसार ३४ टक्के भारतीय सेक्सी अंडरवेअर वापरतात. २२ टक्के लोक हे सेक्सचा आनंद वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली साधनं वापरतात. २२ टक्के भारतीय मसाज ऑइल वापरतात तर ७ टक्के लोक इंद्रिय उत्तेजित करणारं जेल वापरता. सेक्सचा आनंद वाढवण्यासाठी सेक्स खेळण्यांचा (सेक्स टॉय) वापर वाढला आहे. 

भविष्यात हे प्रमाण निश्चितच वाढेल असे अनेक भारतीयांनी सांगितले आहे. स्वतःचं पावित्र्य जपणं हेभारतीयांना अभिमानास्पद वाटतं. इतर देशांच्या तुलनेत पार्टनर बदलण्याचं प्रमाण भारतीयांमध्ये कमी आहे. ४७ टक्के भारतीयांच्या म्हणण्यानुसार चांगला रोमान्स हा चांगल्या सेक्सची पायरी आहे. सेक्स दरम्यान आपल्या पार्टनरला अधिक समाधान देता यावं त्याला त्रास होऊ नये यासाठी सेक्ससंबंधीचे ज्ञान वाढवण्यासाठी ४५ टक्के भारतीय आग्रही असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra Times

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search