तिच्या न येण्याने निराश होता
तिच्या आठवणीत गूंग होता
एक एक क्षण आठवत होता
गालातल्या गालात हसत हेता
नकळत अश्रू गाळत होता
पावसाचे थेंब समझून पुसत होता
रडू येत असून स्वताला हसवत होता
सर्वकाही संपल होत
तरीही स्वत:ला सावरत होता
तिच्यासाठी झूरत होता
प्रत्येक गोष्टीत तिलाच शोधत होता
ती नसतानाही तिच्यासोबत जगत होता
ती येणार आता
प्रेमाने गोंजारणार आता
मीठीत घेणार आता
म्हणून वाट बघत होता
तो फक्त तिच्यावरच प्रेम करत होता
कुलदीप पाटील