पुरुषाचं वय कितीही असलं तरी त्याच्या मनात स्त्रियांच्या बाबतीत ज्या रोमांटिक कल्पना घर करतात, त्या अधिकतर 20 ते 30 वयोगटातील स्त्रियांच्या बाबतीत असतात. नुकत्याच एका सर्वेक्षणातून हे समोर आलं आहे.

फिनलँडमध्ये 18 ते 49 वयोगटातील एकूण 12,656 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. सर्वेक्षणात गेल्या 12 वर्षात तुम्ही कोणत्या वयोगटातील व्यक्तीकडे आकर्षित झाला आणि वास्तवात कोणत्या वयोगटातील व्यक्तीशी तुम्ही सेक्सचा आनंद घेतला, असा प्रश्न विचारण्यात आला.

हफिंग्टनपोस्टच्या वेब आवृत्ती या संदर्भातला रिपोर्ट अपलोड करण्यात आला असून, सर्वेक्षणातून पुरुष आणि स्त्रियांच्या बाबतीतले अनुमान वेगवेगळे आले.

बहुतेक स्त्रियांनी त्यांच्या अनुरुप वयाच्या किंवा त्यांच्या पेक्षा अधिक वयोगटातील पुरुषाकडे आपण आकर्षित झाल्याचं सांगितलं. 30 वर्षे वयोगटातील स्त्रियांनी त्यांच्या पेक्षा चार वर्षांनी अधिक वय असलेल्या पुरुषांकडे आकर्षित झाल्याचं सांगितलं.

तसंच वय जसं वाढलं तसं त्यातील अंतर कमी होत असल्याचं आढळून आलं.

पुरुषांच्या बाबतीत सर्वेक्षणामध्ये असं आढळलं की, पुरुष 20 ते 30 वयोगटातील स्त्रियांकडे अधिक आकर्षित होतात. पुरुष महिल्यांच्या तुलनेत वय वाढतं तसं ते अधिक प्रग्लभ होतात असं दिसून आलं आहे

Blogger द्वारा समर्थित.