५/२२/२०१६

तडका - शिक्षण घेता-घेता

शिक्षण घेता-घेता

शिक्षण घेण्यासाठीची
धडपड कसोशीने आहे
शिक्षण घेणे म्हणजे
वाघिणीचं दुध पिणे आहे

म्हणूनच की काय शिक्षणात
बहू अडथळे घातले आहेत
अन् शिक्षण घेता-घेता इथे
सामान्यांचे जीणे फाटले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search