नियमित सेक्स हाच सुखाचा खरा मंत्र... हा निष्कर्ष काढला आहे आंतरराष्ट्रीय संशोधकांनी. माणसाला सर्वाधिक सुख कशामुळे मिळतं, याचा शोध घेण्याची मोहिम संशोधकांनी गेल्या काही महिन्यांपासून चालवली होती. त्यामध्ये पैशापेक्षाही सेक्समधून जास्त सुख मिळतं, असा निष्कर्ष त्यांच्या हाती लागला.
पैशामुळे निश्चितपणे काही प्रमाणात सुखप्राप्ती होते. परंतु अर्थतज्ञांना वाटते तेवढे नाही. त्यापेक्षा सेक्समधून मिळणारा आनंद आणि सुख कैकपटीने जास्त असते, असे निरीक्षण डर्टमोर्थ कॉलेजातील ज्येष्ठ संशोधक डेविड ब्लॅचफ्लॉवर यांनी नोंदविले आहे, अशी माहिती वेबएमडीच्या ताज्या अंकांत देण्यात आली आहे.
सुमारे १६ हजार लोकांच्या मुलाखती घेऊन, त्यांच्या सेक्स लाइफची माहिती घेऊन, हा अहवाल तयार करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत, ते सेक्स लाइफचा जास्त आनंद घेतात, असे या निरीक्षणांमध्ये आढळले नाही. सेक्सचा आनंद आणि उत्पन्न यांचा परस्परसंबंध नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. त्याशिवाय कमी शिकलेल्या लोकांपेक्षा उच्चशिक्षित लोकांना सेक्समधून अधिक आनंद मिळतो, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.

सेक्सचा सर्वाधिक आनंद एन्जॉय करणारे सर्वाधिक लोक विवाहित आहेत. अविवाहित लोकांपेक्षा विवाहितांना सेक्समुळे जास्त सुख मिळते. काही कारणाने दुःखीकष्टी असलेल्यांना मात्र सेक्स करुनही जास्त आनंद मिळत नाही. त्याउलट आनंदी असलेले लोक वारंवार सेक्सचा आनंद लुटतात, असे मत सिनसिनाटी युनिर्वसिटीतील संशोधक रॉबर्ट हॅटफिल्ड यांनी नोंदविले आहे.


Blogger द्वारा समर्थित.