५/१४/२०१६

हा आणि तो...!!हा एकटक पाहून गेला,
तो क्षणात माझा झाला,
ज्याला आयुष्य समजले मी,
तोच मला हरवून गेला.....

हा लाथाडत गेला,
तो मन मोडत गेला,
ज्याला सर्वस्व मानले मी,
तोच मजला सोडून गेला.....

हा नजरेत भरत गेला,
तो ह्रदयात उतरत गेला,
ज्याचे स्वप्न पाहीले मी,
तोच मला बदनाम करुन गेला.....

हा मनात शिरत गेला,
तो आयुष्यात येत गेला,
ज्याला जोडीदार निवडले मी,
तोच मला विरह देऊन गेला.....

हा रडवत गेला,
तो हसवत राहीला,
ज्याची काळजी घेतली मी,
तोच मला फसवून गेला.....

हा वाटेत भेटत गेला,
तो स्वप्नात दिसत गेला,
ज्याला जिवापाड जपले मी,
तोच मला जिवंतपणी संपवून गेला.....

सुरेश सोनावणे.....

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search