माझ्या साठी सजली असशील,
आरशात पाहून स्वतःलाच
लाजली असशील…
कधी तरी तू हाता वर
मेहेंदी काढली असशील,
हृदयाच्या चिन्हात माझ नाव
लिहील असशील,
कधी तरी तू स्वतःच नाव लिहील
असशील,
आणि तुझ्या सोबत माझ नाव जोडून
पाहिलं
असशील, कधी तरी तू देवाला खरच
विनवल
असशील, स्वतःसाठी म्हणून
माझ्या साठीच
काही मागितलं असशील.
कधी तरी तू
मनाच्या आकांतातून रडली असशील,
माझे
आयुष्य वाढवण्या साठी उपवास केले
असशील.
मग आता आणखी एक कर, एकटयाने कसं
जागाव , तेवढ तूच मला शिकवून जा.
माझ्या साठी मरण माग,
आणि तुझ्या आठवणी घेवून जा...