५/१४/२०१६

नेहमीच माझ्या सोबत...


नेहमीच माझ्या सोबत,
हे अस का होत ,
एकाची साथ मिळते,
अन एकाच हाथ सुटतो ..
माहित आहे मला ,
खुप प्रेम करतोस तू माझ्यावर ,
पण मला हसवण्या साठी ,
स्वतः का रडतोस होउन अनावर ..
तुला दुःखावुन मी हसणे ,
आणि मला हसावुण तू राड़ने ...
ह्याचा अर्थ आणखी काही नाही ,
फक्त माझ्या दुःखाचे दुणे करणे ..
आज कळत आहे ह्या एकांतात ,
अस्तित्व काय आहे माझ ...
प्रेम करणारे जरी फार असले ,
तरी विलीन व्हायच आहे, ह्या एकांतातच ..
तू बोल रे फ़क्त ,
तुझ्या साठी मी काहिही करील..
बोलण मात्र सोडू नकोस ,
ते माझ्या साठी जिवघेण्या हुनही मोठ होइल ..!!!!

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search