६/०९/२०१६

रमतय मन उगाचच....


उगाचच का रमतं मन
आठवणींच्या गुंत्यात
परतीचा रस्ता
ठाऊक नसतानाही..? झडलेल्या झाडाची
उगाचच का मोजतं पानं
शिशिराची पानगळ
सुरू असतानाही.. उगाचच खिन्न होतं
बेभरवशाच्या पावसानं
त्याच्या बरसण्यानं तृष्णा
कधीच भागली नसतानाही.. गर्दीमधे आपलासा असा
चेहरा शोधत राहतं उगाचच
जनावरांच्या गर्दीला 'कळप' म्हणतात माहित असतानाही.. सोडवताना गुंतागुंत
गुंतत चाललोय गुंत्यातच
तरीसुद्धा गुंत्यातच
रमतय मन उगाचच..
रमतय मन उगाचच....

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search