एक उफाळलेली वासना
सारं काही नष्ट करते
स्रीच्या चारित्र्याच्या
चिंध्या चिंध्या करते
तिच्या अब्रूचे मनाविरुद्ध
तिच्यासमोर लचके तोडते
अब्रूवर घाला होतांना
ती मात्र कोलमडून पडते
एका क्षणभरच्या सुखासाठी
तिचे जीवनही संपवते
तिची काही चूक नसतांना
तिला समाजातून उठवते
तिचा आत्मसन्मान चिरडून
जगण्याचा हक्क हिरावून घेते
एक उफाळलेली वासना
पुरुष जातीला बदनाम करते
वासना शेवटी वासनाच
ती बुद्धीला संपवून टाकते
त्या क्षणभरच्या मजेसाठी
स्रीला उपभोग्य वस्तू समजते
स्रीचे माणूसपण नाकारून
भोगून तिला फेकून देते
फक्त शरीर लालसेपोटी
तिचे जीवन उध्वस्त करते
संजय एम निकुंभ