कोमल कोमल ओठांनी तु
किती हळुहळु बोलतेस
जणु बागेतल्या काट्यांमधुनी
फुलांना नाजुकपणे वेचतेस
स्वप्ने तुझीही आहेत ती
स्वताला किती तु सांभाळतेस
काळोख्या रातीला साजेशी
जणु चांदणीच मला भासतेस
भोळ्या मनाची कथा तुझी
ठाव माझ्या काळजाचाच घेतेस
खोटे तुला बोलता येत नाही
उगाच प्रयत्न का करतेस
कळी उमलते मनात माझ्याही
जेव्हा कधीही तु हसतेस
गालावर खळी असावी तुझ्या जी
कोमल चेह-यावर तु छान खुलवतेस...!
कवी-गणेश साळुंखे...!