मी तुझ्यावर प्रेम केलं
अगदी जीवापाड
अर्थात प्रेम म्हणजे काय
हे थोडचं ठाऊक होतं
तू आलीस जीवनात
आयुष्य सुंदर बनत गेलं
कसं काय ते
शब्दात नाही सांगू शकत
एक अनामिक हुरहूर लागली
तू भेटल्यापासून
मनात एक काहूर उठलं
तुझ्या सहवासातून
तू कधी आयुष्य व्यापून टाकलस
कळलं नाही मला
कधी तुझ्यात आकंठ बुडालो
कसे सांगू तुला
पण माझा प्रत्येक क्षण जगण्याचा
तुझ्यामुळे सुंदर झाला
म्हणूनच तर वेड लागलं
तुझं माझ्या काळजाला
नाहीच जगू शकत तुझ्याशिवाय
एकदाचं कळून चुकलं
तेव्हा कळलं मनास
माझं मन प्रेमात पडलं
तू सुंदर आहेस म्हणून
मी तुझ्यावर नाही भाळलो
तू माझं जगणं सुंदर केलसं
म्हणून तुझ्या प्रेमात पडलो
संजय एम निकुंभ