लागणारे साहित्य:
अर्धा कप लसणीच्या पाकळ्या सोललेल्या आणि लहान तुकडे केलेल्या,
दिड ते दोन चमचा कैरी लोणचे मसाला,फोडणीसाठी तीन चमचा तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हिंग, पाव चमचा हळद,३ चमचा लिंबाचा रस,चवीनुसार मीठ.
कसे तयार कराल :
प्रथम एका लहान वाडग्यात चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि अर्धा ते एक चमचा मीठ घालून छान मिक्स करून ठेवावे. साधारण १ तास खारवून ठेवावे. नंतर फोडणी तयार करण्यासाठी कढल्यात तेल गरम करावे आणि मोहोरी घालून तडतडली कि हिंग आणि हळद घालावी. एका वाटीत ही फोडणी काढून ठेवावी.
१ तासानंतर लोणचे मसाला लसणीच्या खारवलेल्या तुकड्यांत मिक्स करावा. त्यात लिंबाचा रस आणि गार झालेली फोडणी घालून मिक्स करावे.निट मिसळावी आणि चवीनुसार मीठ घालावे.आणि लोणचे तयार.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : स्वप्नाली मोरे