६/०७/२०१६

लेमन राईस



जर शिळा भात राहिला असेल तर त्याची फोडणी भर करण्या पेक्षा आपण लेमन राईस करू शकतो त्यासाठी आपल्याला

लागणारे साहित्य:

शिजलेला मोकळा भात(_शिळा किवा ताजा कोणताही ),पाव चमचा हिंग, दोन टिस्पून तूप,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा उडीद डाळ,अर्धा चमचा किसलेले आले,कढीपत्ता पाने,
थोडेसे शेंगदाणे,दिड चमचा लिंबाचा रस,दोन लाल सुक्या मिरच्या,चवीपुरते मिठ आणि कोथिंबीर बारीक चिरून.

कसे तयार कराल:

आधी भात हाताने मोकळा करून घ्यावा. त्यात मिठ आणि लिंबाचा रस घालून हलक्या हाताने मिक्स करावे.नंतर कढईत तूप गरम करावे, त्यात शेंगदाणे लालसर होई पर्यंत शिजवावे. शेंगदाणे शिजले कि त्यात जिरे, हिंग, आले, कढीपत्ता, उडीद डाळ, लाल मिरच्या घालून मिक्स करावे आणि शिजवावे नंतर शेवटी भात फोडणीस घालावा. व्यवस्थित मिक्स करून घ्यावे शेवटी कोथिंबीर वारू पेरून गरमा गरम सर्व्ह करावे.



संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search