६/२३/२०१६

गर्भधारणा रोखण्यासाठी आता पुरुषांसाठीही औषध!


आता, नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुषांवरची जबाबदारी वाढणार असं दिसतंय. कारण, आता गर्भधारणा रोखण्यासाठी पुरुषांसाठी 'वैसालेजेल' नावाचं प्रजननरोधक औषध बनवण्यात आलंय. 
स्वस्त औषध पुरविणाऱ्या एनजीओ परसिमस फाऊडेशनच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पुरुषांना वापरता येईल असं औषध तयार केलंय. या औषधांचा प्राण्यांवर उपयोग केल्यानंतर अनेक सकारात्मक परिणाम समोर आलेत.
सामान्यत: आफ्रिकेवर मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या 'बबून' या माकडांच्या प्रजातीवर या औषधांचा वापर करण्यात आला. जवळपास 15 मादी माकडांशी त्यांचा संबंध आला पण सहा महिन्यानंतरही कोणतीही मादी गर्भवती राहिलेली नाही.   
प्राण्यांवर हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर याचं परिक्षण आता मानवावर करण्याचा निर्णय आता घेण्यात आलाय. 2017 पर्यंत हे औषध बाजारात उपलब्ध होऊ शकेल.  
'वैसालेजेल'चा वापर केवळ एकदा केल्यानंतर एका निश्चित वेळेपर्यंत पुरुष गर्भधारणा टाळू शकतात. ही पद्धती नसबंदीहून वेगळी आहे. योग्य वेळी दुसरं इन्जेक्शन घेऊन पुरुष या औषधाचा परिणाम संपुष्टात आणू शकतात आणि पुन्हा अपत्याला जन्म देण्याची क्षमता वापरात आणू शकतात.   

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search