९/१२/२०१६

मयुरेश्वर मंदिर मोरगाव- अष्टविनायक


पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गावी असलेले हे गणेशस्थान मोरेश्वर अथवा ‘मयुरेश्वर’ या नावाने ओळखले जाते. या देवस्थानी असलेली श्रीगणपतीची मूर्तीसुद्धा स्वयंभूच आहे. मूर्ती उकीडवी बसलेली असून डोईवर नागफणा आहे. सोंड मात्र डावीकडची आहे. मंदिर उत्तराभिमुख असून बांधणी चांगली आहे. आवारात दीपमाळ आहे. या मंदिराच्या आवारातूनच कऱ्हा नदी वाहते. मंदिराच्या समोरच्या चौथऱ्यावर भव्य नंदी असून जवळच पाषाणाचा उंदीर आहे.गाणपत्य संप्रदायाचे हे स्थान म्हणजे आद्यपीठ असून अष्टविनायकात या स्थानाला अग्रस्थान आहे. मोरया गोसावी यांनी या ठिकाणीही तपश्चर्या केली होती व या स्थानाच्या परिसरातील कऱ्हा नदीत त्यांना गणेशमूर्ती प्राप्त झाली होती. पुढे हीच मूर्ती चिंचवडला आणून त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली.
मोरगाव हे पुणे-सातारा मार्गावर असून पुण्यापासून ते ६४ कि.मी. अंतरावर आहे.
नजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे
पुणे-मोरगाव अंतर ६४ कि.मी.


संदर्भ: mr.wikipedia.org, www.Shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:www.tripadvisor.com Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search