९/१०/२०१६

विघ्नहर मंदिर ओझर- अष्टविनायकओझर येथील गणपती ’विघ्नहर’ या नावाने ओळखला जातो. येथील गणेशमूर्ती स्वयंभू व डाव्या सोंडेची असून ती पूर्णाकृती व आसन मांडी घालून बसलेली आहे. गणेश मंदिर पूर्वाभिमुख आहे व त्यासमोर ओळीने तीन सभामंडप आहेत. गाभाऱ्यात पंचायतनातील इतर चार मूर्त्या कोनाड्यात स्थापलेल्या आहेत. देवळाच्या आवारात दीपमाळ आहे.हे मंदिर अठराव्या शतकातील असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकल्यावर या मंदिरावर सोन्याचा कळस चढवला असे म्हणतात. अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. श्रीमंत बाजीराव पेशवे ये या विघ्नहराचे निस्सीम भक्त होते. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे.

भौगोलिक

पुणे-नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे. जवळचे रेल्वे स्टेशन पुणे आहे.आख्ययिका

राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.


इतिहास

१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.बांधकाम

विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.


उत्सव

भाद्रपद गणेश जयंतीला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.


नजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे
मुंबई-पुणे : १९२ कि.मी. (रेल्वेने) , पुणे-ओझर अंतर ८५ कि.मी.

संदर्भ: mr.wikipedia.org, www.shivsena.org
लेखक :anonymous
छायाचित्रे:Google.com 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search