लागणारे साहित्य :
१०० ग्रॅम बदाम,२०० ग्रॅम साखर,पाव चमचा केशर पाण्यात भिजवलेले,३ चमचे तूप.
कसे तयार कराल :
आधी बदामाची साल काढून काप करावे.त्यासाठी रात्रभर बदाम गार पाणात भिजवावे किंवा गरम पाण्यात घालून मिनिटभर उकळावे. नंतर बारीक वाटावे. दीड चमचा तूप वाटाणात मिसळावे. साखरेत पाणी घालून कच्चा पाक करावा. चमचाभर दूध घालून मळी काढून टाकावी. एकतारी पाकापेक्षा जरा कमी पाक होत आला की वाटलेले बदाम त्यात घालावे. ढवळताना थोडे-थोडे तूप घालावे. मिश्रण सुधारसाइतपत झाले की केशर घालावे. चांदीच्या किंवा नक्षिदार भांड्यात काढून ठेवावे. हा हलवा सुधारसासारखा असतो व जास्त खाल्ल्यास जड पडतो. वाढताना लहान चमचा ठेवावा व प्रत्येकी डावभर हलवा लहान बॉल किंवा वाट्यात घालून द्यावा.
Shop thought any advertising links on this website and get upto 50% off on your kitchen appliances purchase.
संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous