९/१४/२०१६

शरीरदोषांमुळे होणाऱ्या लैंगिक समस्याविवाहामुळे मुलींना अकाली शरीरसंबंधाला सामोरे जावे लागते. इजा होणे, अकाली गर्भधारणा, मैथुनाविषयी भीती, इ. दुष्परिणाम त्यामुळे होतात. लहान वय असल्याने कुटुंबात गौण स्थान निर्माण होते व ते बरीच वर्षे कायम राहते; स्त्री-पुरुष संबंधात यामुळे एक उच्च-नीचता तयार होते. बालविवाह हरप्रयत्नाने टाळले पाहिजेत.
योनिमार्गाचा जंतुदोष-दाह मूत्रमार्गाचा दाह किंवा ओटीपोटात काहीतरी जंतुदोष असणे, गर्भाशयाच्या तोंडाला सूज असणे किंवा योनिमार्गात जखमा हे वेदनेमागचे प्रमुख कारण असते. अशा स्त्रीची आतून तपासणी करताना याच प्रकारची वेदना होते. योग्य उपचाराने ही तक्रार दूर होऊ शकते.
मधुमेह, गलग्रंथीचे आजार व इतर संप्रेरक ग्रंथीच्या बहुतेक आजारात स्त्रियांच्या कामेच्छा कमी होतात. योग्य तपासणीअंती दोष कळू शकतो.

Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search