तुझी सावली बनून राहील सगळीकडे
पण संकटात माझा हात धरशील ना
जेव्हा सगळी लोक माझी साथ सोडतील
तेव्हा माझ्या सोबत ठामपणे उभा राहशील ना
माझे मित्रपरिवार माझ्या सखी विसरून गेले
तुझ्या साठी पण तू माझ्या साठी एकनिष्ट
राहाशिल ना
अंधारात एकटी चालताना माझा प्रकाश बनून
राहशील ना
प्रत्येक श्वासात तुझा नाव जपते पण
तू दिवसातून एकदा तरी माझी आठवण काढशील ना
तुझ्या नावात तुझ्या विश्ववात मी रमेल कायम
तुझ्या आयुष्यातील काही क्षण
या वेडूलीसाठी ठेवशील ना
तुला मी माझा काळीज मानेल माझ्या आत्मा आहेस
तू
पण तुझ्या आयुष्यातील सुर्यास्त
तरी मला मानशील ना .