खुनशी नजरेनं बिथरलेला तो गवा केव्हाही गाडीला धडक मारील, असा बाका प्रसंग उद्भवला होता. एका अर्थानं समोर प्राणसंकटच उभं ठाकलेलं.
प्राणभयानं घाबरून गेलेले वसंतराव देशपांडे पु.लं.ना हळूच म्हणाले, "भाई, ही इज चार्जिंग!"
वसंतरावांच्या तोंडचे हे इंग्रजी उद्गार ऐकून तसल्या जीवघेण्या प्रसंगातही पु.लं. म्हणाले, "सुनीताबाई, आलं का लक्षात ? त्या गव्याला कळू नये, म्हणून वसंतराव इंग्रजी बोलताहेत!"