
"खुद्द महाराष्ट्रात आज मराठीपेक्षा इंग्रजी भाषेलाच जास्त मान आहे. इंग्रजाच्या आमदनीमध्ये तिला राजभाषा म्हणून मान मिळत होता. तेव्हा इंग्रजी शिकायची सक्ती होती, आता तशी सक्तीही नाही.
पण इंग्रजी भाषेची किल्ली हातात असली की, अभ्युदयाची अनेक दारं उघडली जातात, हे अनेक लोकांनी ओळखलेलं आहे. किंबहुना, पुण्याहून मुंबईला जाताना नव्यानेच कारखानदारीत शिरलेले जोशी-कुलकर्णीसुद्धा एकमेकांशी इंग्रजीत बोलत असतात.
आता त्यांचं इंग्रजी ऐकल्यावर इंग्रज हा देश सोडून का गेला, हे आपल्याला कळतं."
- पु.लं.देशपांडे
"मला कवितेतली 'ओळ' म्हणण्यापेक्षा कवितेतलं 'चरण' म्हणलेलं आवडतं.
एवढंच नव्हे तर गीताला 'पद' म्हटलेलं अधिक आवडतं.
चरण, पद ह्या शब्दांतून चालणं सुचवलं जातं. आणि म्हणूनच पदाला चाल येते."
- पु.लं.देशपांडे (संग्रहित)
"शहाणी माणसं नेहमी ज्योतिषाच्या सल्ल्याने वागतात.
हां, आता कुंडलीत चांगला ज्योतिषी मिळण्याचा योग मात्र असायला हवा."
- पु.लं.देशपांडे
"स्तुतीचा 'वा' देखील योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पडावा.
भलत्या ठिकाणी 'वा' दिल्यावर 'नर'देखील 'वानर' होण्याची भीती असते."
- पु.लं.
"माणसाचं वय जसं जसं वाढत जातं तस तसं आपल्या हातुन कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या ह्यापेक्षा कुठल्या राहुन गेल्या ह्याचीच चुटपुट लागून राहते."
- पु.लं.
"प्रश्नातून सुटका नाहीच. माझीच नव्हे, कुणाचीच नाही! मग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे?
शेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच. मी त्या प्रश्न चिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहे हे मला ठाऊक नव्हते. प्रश्नचिन्हाच्या त्या आकड्याखालीच शून्य हे त्याचे उत्तरही असते. विरामिचन्हे इतकी विचारपूर्वक बनवली असतील याची मला कल्पना नव्हती!"
- पु.लं.देशपांडे
"आपल्या यशापशयाचं स्वामित्व स्वतःवर घेण्याची ज्याला छाती नाही. त्याने कलानिर्मितीच्या फंदात पडू नये."
- पु.लं.
"मोठेपणी महागड्या हॉटेलमध्ये पार्ट्या देणार्या मित्रापेक्षा लहानपणी न मागता 'इकडे ये' म्हणून प्रेमाने हातावर खोबऱ्याची वडी ठेवणारी शेजारची म्हातारी आयुष्यभर आठवत असते."
- पु.लं
" जगातला सर्वात सुंदर चेहरा म्हणजे कृतज्ञ चेहरा!
खरं तर माणसांनी एकत्र येऊन आनंदाचा गुणाकार करावा आणि दुःखाचा भागाकार करून त्याची बाकी शून्य करून टाकावी! "
- पु.लं.
एकदा पु.लं.च्या ओळखीच्या एका मुलीचे लग्न ठरलेले होते.
योगायोगाने त्या मुलीचे माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते.
हे कळल्यावर पु.लं. म्हणाले,
"बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो!"
जे संस्कार समाजात जबाबदार नागरिक म्हणून जगायची शिकवण देत नाहीत त्यांना काहीही अर्थ नसतो."
- पु.ल. (एक शून्य मी)
"जीन्स पँन्ट , टी-शर्ट , केस कापलेली आजकालची मुलं बघीतली कि त्यांच्यात मुलगी कुठली आणि मुलगा कुठला हेच मला समजत नाही..."
मी गोरक्षकरला सहज हे विचारलं तर तो म्हणतो, "काय करायचं बरं का धोंडोपंत, त्यांच्या जवळ जायचं आणि एकदम घाणेरडे जोक करायचे त्यातला जो लाजेल तो मुलगा!"
- पु.लं. (असामी असामी)
"आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते.
कारण जो आनंदाचा क्षण असतो ना, तोच एक 'मुहूर्त' असतो."
- पु.लं.
"विठ्ठलापेक्षा त्याच्यापुढे लोटांगण घालणाऱ्या वारकऱ्याच्या दर्शनाचीच मला अधिक ओढ वाटते."
- पु.लं.