तुझ्यात मन माझे शोधत होतो मी
तुझ्या धुंद गाण्यात सूर लावत होतो मी
तुझ्या स्वप्नात स्वप्न पहात होतो मी
तुझ्या स्मृतीत मग्न होत होतो मी
तुझ्या सावलीत चालत होतो मी
आरशातही तुला न्याहळत होतो मी
हरवली आहेस आता तु अन शोधत आहे मलाच मी
शोधणेही स्वतःला कठीण नाही
तुझ्याच मनात कुठेतरी असेलच ना दाटलेला मी