१२/०३/२०१६

तडका - हे सत्य आहे

हे सत्य आहे

विश्वासाच्या पडद्याखाली
अंधत्वाने जपलेले आहेत
बुवा बाबांच्या वेशामध्ये
नराधमही लपलेले आहेत

अध्यात्माच्या पदरा आडून
रासलीला खेळल्या जातात
अंधविश्वासी काया सहज
धोक्यामध्ये घोळल्या जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search