लागणारे साहित्य :
दोन मध्यम आकारची वांगे,अर्धा कप तांदूळ पीठ,एक चमचा बेसन पीठ,दोन चमचे लाल तिखट,पाव चमचा हळद,चिमटी भर हिंग,अर्धा चमचा जीरेपूड,अर्धा चमचा धणेपूड,अर्धा चमचा आमचूर पावडर,चवीपुरते मीठ,आणि साधारण वाटीभर तेल.
कसे तयार कराल:
सर्प्रथम वांग्याच्या गोल चकत्या कापून घ्याव्यात आणि दहा मिनिटे मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावे.नंतर पाण्याबाहेर काढून वांग्यावरील पाणी टिपून घ्यावे.चणा पीठ, तांदूळ पीठ, हळद, तिखट, हिंग, मीठ, जीरेपूड, धणेपूड, आमचूर पावडर पाणी न वापरता एकत्र करावे.काप दोन्ही बाजूंनी वरील मिश्रणात घोळवून घ्यावे भाजी प्रमाणे. नॉन स्टिक तव्यावर दोन ते तीन चमचे तेल घालावे. आणि काप तव्यावर ठेवावे. मध्यम गैस करून वरुन झाकण ठेवून काप शिजू द्यावेत आणि बाजूने थोडे तेल सोडावे. एक बाजू लालसर झाल्यावर काप दुसर्या बाजूवर परतून घ्यावेत. पाच मिनिटांनी सुरीने काप शिजले आहेत की नाही ते बघावे. आणि गरम गरम जेनाबरोबर सेटव करावे.
संदर्भ:Facebook share
लेखक : anonymous