१/३१/२०१७

पहिलं प्रेम आता "बायको" वरच करायचं...एकदा गावी जाण्यासाठी
एस टी मध्ये बसलो
सीटवरती बसताना
मनामधीच हसलो....
.
सीट होतं दोघांचं
एकटी होती लडकी
जवळ तिच्या बसलो की
दिल मे आग भडकी...
.
माझ्याकडे पाहून
ती गालात हसली
मला वाटलं नक्कीच
ती आता फसली...
.
रंगाने होती गोरी
चेहर्यावरती हसरे भाव
तिला पटवण्याचा माझ्या
मनाने केला उठाव...
.
एस टी थोडी आदळली की
तिचा स्पर्श व्हायचा
श्रावणातल्या सरींची
आठवण करून द्यायचा...
.
बसण्यात थोडं अंतर होतं
ते पण आता सरलं
बघता बघता एसटी ला
अंधारानं घेरलं....
.
अंधाराचा फायदा घ्यावा
असं मला वाटलं
विचारांचं काहूर
मनात माझ्या पेटलं....
.
काय बोलावं तिच्याशी
काहीच कळत नव्हतं
मनात यायचं बोलावं
ओठांवरती वळत नव्हतं...
.
कुणी इकडं बघतं का
पहात होतो जवळपास
ती वाटायची पारो
मी तिचा देवदास...
.
मी मग ठरवलं
तिच्याशी आता बोलायचं
मनातलं प्रेम
तिच्यापाशी खोलायचं...
.
मी बोलणार इतक्यात
तिने काढला "खाऊ"
हळूच म्हणाली थोडासा
खाता का हो "भाऊ"
.
त्याचदिवशी ठरवलं
"प्रत्येकीवर" नाही मरायचं
पहिलं प्रेम आता
"बायको" वरच करायचं...

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search