लागणारे साहित्य:
अर्धा किलो गाजर,एक लिटर दूध,अर्धा कप साखर,पाव चमचा वेलची पावडर,एक
चमचा तूप,दोन चमचे पिस्ता, बदाम काजू लहान कप करून.
कसे तयार कराल:
आधी गाजरं धुवून किसून घ्यावी नंतर एका जाड पातेल्यात तूप गरम करून त्यावर
किसलेले गाजर परतावे. मंद गैस वर तीन ते चार मिनिटे उकळी काढावी.गाजर थोडी मऊ झाली
कि दूध घालावे आणि काही मिनिटे उकळवावे. आता साखर आणि ड्राय फ्रुट्स घालावी. मंद गैसवर
शिजू द्यावे. गरजेएवढा दाटपणा आला कि वेलची पूड घालावी. ढवळून गैस बंद करावी.
ही खीर गार किंवा गरम कशीही सर्व करा.
संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous