२/२४/२०१७

तुम्हालाही सिक्स पॅक अॅब्स बनवायचे आहेत?


आजच्या जमान्यात तरूणांमध्ये सिक्स पॅक अॅब बनवण्याचं फॅड वाढतच आहे. पिळदार शरीर आणि स्लिम बॉडी बनवण्यासाठी तरूणांना जिम आकर्षित करते.  

सिक्स पॅक हे आजकालच्या तरूणांची सुप्त इच्छा आहे. साधारणपणे 100 पैकी 90 तरूणांना सिक्स पॅक बनवायची इच्छा असते. त्यामुळे ते जिमकडे आकर्षित होतात, असं मत जिम ट्रेनर आणि बॉडीबिल्डिंगचे जाणकार व्यक्त करतात.

साधारणपणे, काही महिने भरपूर व्यायाम आणि खाणं-पिणं चांगलं ठेवलं की आपल्याला चांगले अॅब्स येतात. मात्र त्यासाठी जिममध्ये खूप घामही गाळावा लागतो.   
    
या मेहनतीनंतर आकर्षक अॅब्स येतात. मात्र किती लोक ते अॅब्स टिकवून ठेवतात? की फक्त सोशल मीडियावर आपला सिक्स पॅकचा फोटो टाकून काही काळ वाहवा मिळवतात असाही प्रश्न जाणकार उपस्थित करतात.

हे सिक्स पॅक टिकवून ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यासाठी काही जाणकारांनी काही उपाय सांगितलेले उपाय.

जिमचे मालक आणि ट्रेनर यांच्या माहितीनुसार सिक्स पॅकसाठी व्यायामासोबतच खाण्यापिण्यावरही ध्यान द्यावे लागते. अॅब्स बनविण्यासाठी कमीत कमी कार्बोहायड्रेट्स आणि जास्त प्रोटीन असलेला आहार घेणं गरजेचं असतं.

सिक्स पॅकसाठी असा ठेवा आहार.
आपल्या आहारात 60 टक्के प्रोटीन, 20 टक्के कार्बोहायड्रेट्स आणि 20 टक्के फॅट असणे आवश्यक आहे. यासोबतच व्यायाम करताना सिट-अप्स, साइड बेन्डिग, रेजेज, कंचेस तसंच ट्विस्टिंग करावे अशी माहिती जाणकार सांगतात. जर का आपण अशाप्रकारचा आहार ठेवला तर तीन महिन्यात आपले सिक्स पॅक दिसून येतील असा दावाही जाणाकारांनी केला आहे.

फिजीशियन तज्ज्ञांच्या मते, आपले शरीर आकर्षक बनवायचे असेल तर आपल्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात प्रतिकिलो एक ग्रॅम या प्रमाणात प्रोटीन घ्यावे. प्रोटीनचे हे प्रमाण ठेवले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त प्रोटीन घेण्याची आवश्यकता नाही. 

यासोबतच जर का हेल्थ सप्लिमेंटमध्ये प्रोटीन असतील तर त्यामुळे कसलेही नुकसान नाही. मात्र त्या हेल्थ सप्लिमेंटसोबत स्टेरॉयड्स किंवा अन्य काही घेत असाल तर, ते आपल्याला नुकसान पोहोचवतं असंही तज्ज्ञांनी सांगितले.     

ABP Majha

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search