२/१३/२०१७

अभिलाषा
त्या दिवशी सिनेमा पाहायला गेलो होतो , आठवतोय तो दिवस आजही मला, जास्त गर्दी नव्हती , ती नेहमी सारखी माझा हात हातात घेऊन सिनेमा पाहत होती, अन मी अधून मधून तिच्या कडे पाहत होतो , काही वेळाने माझ्या खांद्यावर डोक ठेवलं आणि काही वेळ अशीच होती, तिचे केस माझ्या डोळ्यात जाऊ नयेत म्हणून मी तिचे केस सावरायला गेलो , अन तीने चेहरा माझ्या कडे केला, मी smile दिली, पण ती असच पाहत राहिली मला, तिचे ते डोळे माझ्या कडे निराळ्याच नजरने पाहत होते, मी डोळ्याच्या भोवया उंचावल्या तर तिने लग्गेच मान खली घातली, मी उजवा हात तिच्या खांद्यावर टाकून तीला जवळ घेतलं आणि कानात म्हंटल 

"काय झाल??" समोरून मन हलवून नकार आला, मी लग्गेच डाव्या हाताने तिचा चेहरा माझ्या जवळ केला आणि माझे ओठ तिच्या ओठांजवळ नेले, तिच्या ओठांतून शब्द आला "थांब" मी थांबलो आणि पाहत राहिलो तिच्या कडे , तिने आपला चष्मा काढून बाजूला ठेवला आणि पुढे माझ्या जवळ बघताच मी माझे ओठ तिच्या ओठांवर ठेवले तिचे डोळे बंद झाले होते आणि आमच्या ओठांची हालचाल सुरु झाली होती, ओठ ओठांशी जणू खेळत होते , इतक्या सहजतेने ते होत होत , काही काल त्याच क्षणात आम्ही गुंतून गेलो , मग लाळ ओठावर येऊ लागली , मला वाटल थांबूया आता पण समोर ओठांची हालचाल आता अधिकच वाढत होती, आणि मी त्यावर प्रतिक्रिया देत होतो, हळुवार होणार ओठांच घर्षण आता मध्ये मध्ये जोरात होत होत, ओठांची हालचाल वाढत होती, तेवढ्यात तिने आपल्या ओठांच्या पाकळ्यात माझा खालचा ओठ दाबून धरला आणि माझ्या अजून जवळ आली, माझा हात तिच्या गालावरून मागे गेला अन ओठ काही क्षणासाठी वेगळे झाले आणि परत जवळ झाले, आता मात्र अंगात वेगळीच शीव-शीव येत होती, 
एक जोम येत होता, हव्यास वाढत होती, स्पर्श अजून अजून करावासा वाटत होता.....

तेवड्यात सिनेमा संपला , ती लग्गेच बाजूला झाली, ओढणी सावरली, मीही shirt वेगेरे व्यवस्तीत केल, अस पहिल्यांदाच झाल होत, तर काही काल आम्ही गांगृनच केलो होतो सिनेमा संपला होता, दोघ उठलो आणि रांगेसोबत बाहेर जाऊ लागलो, बाहेर आलो तर तिच्या चेहरा थोडस गोंधलेला झाला होता, तरी ती मध्ये मध्ये माझ्या जवळ पाहून लाजत होती , हसत होती , माझ्या सोबत चालताना कधी माझा हात पकडत होती, कधी गाण गुणगुणत होती, एकदम खुश होती, अस तीच कधी होत नव्हत सहसा, शांत असायची नेहमी, एवडी स्वतंत्र मला या आधी कध्धीच वाटली नाही 

काही इच्छा पूर्ण झाल्या कि , मनात आनंदाच्या लहरी वाहू लागतात , आणि आपण त्यात वाहत जाव ......

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search