आज कित्येक दिवसांनी
समोर ती दिसली
बघताच मी तिच्याकडे
नजर तिची झुकली
अंगावरती साडी
अन् कपाळावरती कुंकू
क्षणभर माझ्या मनाला
चावला जसा विंचू
माझ्याकडे पाहून
हळूवार ती हसली
थोडसं खाली पाहून
झटकन ती बोलली
"बाळा, मामा बघ मामा"
चक्क डोळ्यासमोर सारं
बदलून गेलं होत
आतल्या आत मन माझं
हमसून हमसून ओरडतं होतं
चेह-यावरती हसू दाखवत
कारण मी शोधत होतो
कित्येक दिवसाच्या भेटीनंतरही
पळवाटेची गरज होती
तिच्यापासून निघता निघता
पुटपुटलोही मी थोडं
तिन काय म्हणताच मात्र
हसलो फक्त वेडं
समोर मित्र दिसताच
विचारले त्याने मला
काही नाही म्हंटल
फक्त थोडं वाईट वाटलं
बाकी म्हटलं काही
सांगायसारख उरलं नाहं
फक्त एकच सांगतो
चक्क मामा झालो रावं
चक्क मामा झालो रावं..