लागणारे साहित्य:
एक कप ज्वारीचे पीठ,एक चमचा मैदा,अर्धा चमचा तीळ,अर्धा चमचा जीरे जरासे कुटून घ्या,पाव चमचा ओवा,एक चमचा लाल तिखट,
पाव चमचा हिंग,अर्धा कप पाणी,अर्धा चमचा मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कसे तयार कराल:
सर्वप्रथम ज्वारीचे पीठ मोठ्या सुती कपड्यात
बांधून पुडी बनवावी आणि कुकरमध्ये तळाला थोडेसे पाणी घालून त्यात भोकाची ताटली
ठेवावी. त्यावर कुकरच्या आतील डबा ठेवून त्यात पिठाची पुडी ठेवावी.कुकरच्या तीन ते
चार शिट्ट्या होवू द्याव्यात आणि गॅस बंद करावा. कुकरचे प्रेशर कमी झाले कि कुकर
उघडून पुडी बाहेर काढावी. त्यातील पीठ आता जरा घट्ट झाले असेल.हाताने गुठळ्या
फोडून चाळून घ्यावे. त्यात मैदा, तीळ, जीरे, ओवा, लाल तिखट, हिंग आणि मीठ
घालून मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालत राहावे आणि मळावे. चवीनुसार मीठ घालावे. लक्ष
असुद्या पीठ खूप घट्ट किंवा खूप सैलसुद्धा होता कामा नये.चकली यंत्राला आतून
तेलाचा हात लावावा. चकलीची चकती बसवून साच्यात पीठ भरावे. कढईत तेल गरम करून गैस
मध्यम करावी. चकल्या पाडून लाल रंग येई पर्यंत तळाव्यात.तळलेल्या चकल्या कागदावर
काढून थंड होवू द्याव्यात. नंतर डब्यात भरून ठेवाव्यात.
संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous