२/१०/२०१७

शाळाबसलो होतो खिडकीत डोकं घालून , पाहत होतो कोसळणारा  पाऊस , निवांत शांत सगळं आणि पावसाचं संगीत फक्त ..
बरं वाटत असं शांत निवांत बसून काही तरी पाहत बसणं तेवड्यात सोनल चा call आला , पहिल्यांदा सोनल  केला होता मला वाटलं काही असेल विशेष
मी लग्गेच उचलला

मी - hello

सोनल - अरे वेड्या , online  ये

मी - हा आलोच

मी फोन ठेऊन online आलो

मी - बोल

सोनल - काय करतोस

मी - काही नाही बसलोय असच , बोल ना msg  केलास काही झाला का ?

सोनल - नाही रे , सहजच केला , कंटाळा आलाय रे घरी ..


मी - मग काय विचार काय आहे ?

सोनल  - भेटशील का आज ?

मी - आज ? कधी ? कुठे ? 

सोनल - चल  शाळेत जाऊया  

मी - शाळेशी आठवण येते वाट्त ?

सोनल- हो रे येतोस तू ? जाऊया आपण खरच.. 

मी - हो चालेल , शाळेच्या इथे भेट मग 

सोनल - हो चालेल bye 


मी ठरल्या प्रमाणे वाट बघत उभा होतो , ५ मिनिटे झाली असतील सोनल समोरून चालत येताना दिसली, मी तिच्या समोर गेलो , चेहर्यावर छान  अस हास्य देत मला म्हणाली चला जाऊया ..

मी - हो , ओळखतील का आपल्याला ?

सोनल- हो रे चल तर 

शाळेच्या गेट मधून आत जाताना , सर्व आधीचे दिवस आठवत होते , 
नेहमी घाई घाईत , धावत पळत जायचो , आज आरामात शाळेच्या इमारती कडे पाहत आत गेलो , 

पहिल्या मजल्यावर शिक्षक बसायचे तिथेच गेलो आधी ... 
शिक्षक बसायचे त्या खोलीत प्रवेश करताना वाटायची भीती आजही वाटली, जरा थांबलोच मी , मग हळू हळू आत डोक घालून पाहिलं कोणी ओळखीच आहे का , तेव्हा त्या कोपर्यातल्या शिक्षिकेने आम्हाला ओळ्खल आणि जवळ बोलवलं , आम्ही गेलो 

तृप्ती त्याचं नाव , मराठी शिकवायच्या आणि इतिहासही , ओलायला छान होत्या , शिकवायच्या हि छान , मला तर आवडायचं त्याचं शिकवण , सोनल ने त्यांना विचारलं कश्या आहात तुम्ही ?

शिक्षिका - मजेत , तुम्ही कसे  आहात ?

दोघ - आम्ही पण मजेत ... 

मग काय करतो कस करतो त्या गप्पा झाल्या .....आणि मी म्हणालो चाल ४ थ्या floor वर जाऊया कॉम्पुटर रूम मध्ये , त्या teacher असतील ...आम्ही सर्व जिने चडत वर जात होतो तस तस शाळा नावाची आई आम्हाला गोंजारत होती , तिच्या मायेची उभ अजूनही जाणवत होती , जिने चढताना सोनल २-३ वेळा तरी बोल्ली असेल "खूप मस्त वाटतंय रे ..!"

कॉम्पुटर रूम मध्ये गेलो त्याचं teacher होत्या शिकवत होत्या मुलांना , आम्हाला पाहिलं आणि मुलांना काही तर करायला सांगून आमच्या जवळ आल्या आणि दुसऱ्या वर्गात घेऊन गेल्या जिथे कोणी न्हवत , आणि खूप आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर , खूप काही विचारल त्यांनी काय करता , कस काय , मज्जा येते कि नाय ....आम्ही सगळ सांगत होतो पण शाळेची आठवण येते ...अस मध्ये मध्ये मनात किव्वा बोलण्यात येतच होत .

त्या teacher वयाने छोट्या होत्या त्यामुळे त्यांना काळत होत आमच शाळेबद्दलच प्रेम ... त्याही हसऱ्या चेहऱ्याने ऐकत होत्या आणि कसल्या तरी समाधानाची जुळूक अधून मधून त्यांच्या डोळ्यात दिसत होती , त्यांना कसलं समाधान मिळत होत ते नाही ठाऊक पण शाळेच्या मायेच्या कुशीत आम्ही खुश होतो 

खूप वेळ आम्ही तिथेच गप्पा मारत होतो ... खूप साऱ्या शाळेच्या आठवणी एकामागून एक बाहेर येत होत्या ...
आणि आमच्या सोबत त्या शिक्षिका हि ....

काही वेळाने त्यांचा निरोप घेऊन खाली येत असताना मुख्याध्यापक च office दिसलं पण तिथे जायची काय आमची हिम्मत झाली नाही .. मग तसच शाळेच्या बाहेर आलो ... आणि सोनल माझ्या डोक्यावर शाळेतल्या सारखी टपली मारत बोलली आज तुझी पाळी ...


त्या दिवशी garden मध्ये chinese वडापाव दिला होता आठवलं मला ....

मी - हो आठवलं ... शाळेचा chinese वडापाव तू garden मध्ये दिला होता ...आता शाळेची आठवण देणारा ..खाऊया ..

आमच्या दोघांची वारी निघाली chinese वडापाव कडे...तिथे तेच काका होते ..

मी - काय काका ओळ्खल का ?

काका - हो .. वडापाव देऊ न ?

मी - हो द्या

काका -( वडापाव देत ) शाळा झाली तुमचीआता काय मग ?

आम्ही दोघ - आता college ....

वडापाव घेऊन आम्ही खात खात रस्त्याने चालत होतो ...मनात आणि जिभेवर आठवणीं ची चव चाखत होतो .....

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search