college चे सुरुवातीचे दिवस होते, १ आठवडा झाला असेल जेमतेम, नवीन मित्र, नवीन सभोवतालच वातावरण, आणि नवीन ओळख
बस stop वर असायची उभी college सुटल्यावर, कधी दिसायची कधी नाही. पण त्या ४-५ दिवसात सतत दिसायची college वरून घरी जाताना, त्या दिवशी मी smile दिली , तिनेही smile दिली, इतक सहज झाल ते कि वाटलच नाही कोणी अनोळखी व्यक्ती ला मी अस smile देतोय. पंजाबी dress मध्ये चष्मा घालून, हातात सतत खेळणारा mobile, गोरा चेहरा, काळेभोर केस, दिसायला सुबक, उंचीला कमी तरी शोभून दिसायची, अस सर्व असताना त्या मुलीने माझ्या smile ला smile ने उत्तर दिल.
त्या आचार्याने मी तिच्याकडे पाहत होतो तेवड्यात बस आली, मी तिच्या आधी चढलो आणि मला माहित आहे ती “महिलांसाठी” त्याच seat वर बसणार आहे म्हणून मी त्याच्या मागच्या seat वर जाऊन बसलो. बस मध्ये जास्त गर्दी नव्हती ती कुठेही बसू शकत होती. पण ती माझ्या पुढच्याच seat वर बसली. दुसरा अशार्याचा धक्का, काही वेळाने बस सुरु झाली. तिने काही माझ्या कडे मागे वळून पाहिलं नाही पण मी मात्र मागून तिलाच पाहत होतो कारण इतक्या जवळून मी नव्हत पाहिलं तीला.
तिचा चेहरा दिसत नसला तरी तिचे नीट विंचरलेले केस, केसातला क्लीप अस काही उगाचच पाहत होतो, बस ५-६ stops गेल्यावर अचानक थांबली, “बस खराब झाली” ,”उतरा ..उतरा ” असे आवाज माझ्या कानी येऊ लागले. ती उठली अन लग्गेच उतरली पण बस मधून, मी पण उतरलो अन तीला शोधू लागलो, बस मधले सर्व जन उतरल्यामुळे मला काही ती दिसनासी झाली, तेवड्यात मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर २ वेळा हळूच tap केल. ती सापडत नाही अन कोणी मागून tap करतय...?
मागे वळून पाहिलं तर चक्क तीच .....३ रा धक्का
मी : (अडखळत) हेलो ..hi
ती: hi ..कोणाला शोधतोय ?
मी : (गालात हसून) तुलाच
ती : मी मागे उभी होती, मला वाटल तू मागून उतरशील
मी : तू उतरलीस न मग तुझ्या मागूनच उतरलो ..but तू ...
ती : दुसरी बस पकड मग आता
मी : तू ?
ती : नाही २ stop आहेत चालत जाईन मी
मी : चल मी पण येतो .. चालेल न ? (अस पहिल्यांदाच केल मी कोणा मुलीला विचारलं )
ती : हो चालेल पण तू कुठे राहतोस ?
(मी खूप लांब राहत होतो पण बोललो)
मी : अरे इथे माझ्या मित्राच office मध्ये भेटन त्याला
ती : चल मग
अस मग सोबत चालत होतो ... खूप मस्त बोलत होती, ऐकतच रहावस वाटत होत पण मीच जास्त बोलत होतो माहित नाही का ??
तिच्या कडे मी भिन्दास पाहत होतो अन तीही माझ्या कडे ..स्पष्ट बोलत होती, वाटतच नव्हत पहिल्यांदा बोलतोय,.आम्ही २-३ वेळा तरी बस मधून उतरल्यावर जे झाल त्यावर हसलो .. माहित नाही का!
गोलसर चेहरा, हसताना गुलाबी रंगाचा glow यायचा तिच्या चेहऱ्यावर, फक्त जराशी हसली तरी गालावर खळी यायची अस सगळ पाहून मी जास्तच उतावळेपण दाखवत होतो अन बडबड करत होतो. तीही माझ्या बोलण्याला प्रतिसाद देत होती. समजून घेत होती मी काय बोलतोय ते.
कोणी दोन मानस जेव्हा पहिल्यांदा भेटतात तेव्हा काय बोलत असतील तेच ती बोलत होती, मी मात्र उगाच पटेली मारत होतो. तरी ती शांत आणि नेमक उत्तर देत होती. बोलताना तिच्या ओठांची हालचाल अशी काही ह्यायची कि वाटायचं कि बोलायचं दुसर अन बोलतेय दुसर, मला तर निराळच वाटत होत
ती : चल आता जा तू, मी जाईन
( वाऱ्याची झुळूक येऊन लग्गेच नाहीशी होते तसा काहीसा क्षण होता माझ्यासाठी ...... लग्गेच आला तिचा stop ... असा विचार करत मी उत्तर दिले )
मी : हो bye
आणि ती समोरून निघून गेली अन मी माझ्या घरच्या परतीचा रस्ता धरला
काही धक्के चांगले वाटतात प्रेमाने दिले तर.....