नेहमी प्रमाणे रात्री १० ला तिचा msg आला ...

ती : हेल्लो , जेवलास का ?

मी : हो आणि तू ?

ती: मी पण आत्ताच ... आज कंटाळा आलाय रे खूप 

मी : का ग ? काय झाल ?

ती : माहित नाही , काही तरी वेगळ बोलूया आज 

मी : वेगळ ...काही तरी खास ??

ती : हो...काही तरी खास 

आम्ही दोघ अस रोज गप्पा मारायचो रात्री , खूप गप्पा ह्यायच्या , कश्यावरही बोलायचो त्या दिवशी ती बोलली काही तरी वेगळ बोलूया आणि मी सहजच तिच्या ललग्नाबद्दल विचारलं 

मी : तुझ लग्न कधी होईल ?

ती : ३-४ वर्षात , का रे तूला घाई लागलीय का लग्नाची माझ्या ?

मी : हो! तू कर लग्न आणि सांग मला लग्ना नंतरची मज्जा 

ती : हट , अस कोणी सांगत का?? 

मी : सांगू नाही शकत , imagine तर करू शकतो ना ?

ती : मला नाही जमत अस काही imagine करायला ..तूच सांग तुला काय वाटतंय ते 

मी : हो का .... मी शिकवतो मग तुला ...समज तुझ लग्न झालाय ...लग्ना नंतरचा दुसरा दिवस आहे 

ती : मग पहिला दिवस ?

मी : पहिल्या दिवशी पाहुणे वेगेरे असतात ना 

ती : हाहाहा ... बरोबर ... २ रा दिवस पुढे 

मी : लग्नानंतर च्या दुसऱ्या दिवशी लवकर उठून , मस्त अंघोळ वेगेरे करून , तुझ्या आवडत्या रंगाची साडी नेसून , आपल्या  पती साठी चहा घेऊन जात आहेस 

ती : हिरवा रंग ... साडीचा .. मला खूप आवडतो 

मी : हिरव्या रंगात ... नुकतीच अंघोळ केलेली ... ओले केस ....आणि बेडरूम मध्ये चाललीस चहा घेऊन 

ती : wow मस्त .. पुढे बोलत राहा 

मी : बेडरूम मध्ये  येतेस ... तुझे पतीदेव झोपलेले असतात .... समोरच्या टेबलावर चहा ठेवतेस आणि त्याला उठावण्यासाठी हाक करतेस 

ती : मी नावानेच हाक मरेन माझ्या hubby ला 

मी : हो काहीही बोल  ...तुझाच आहे तो .....

ती : हेहे हा ... पुढे सांग 

मी : हाक मारून पण ते उठत नाहीत ... मग तुझ लक्ष कपाटाच्या आरश्याकडे जात ....त्यात तुझ सुंदर आणि मोहक रूप जणू काही तुलाच पाहत असत.तू आरश्यात स्वतःला नेहाळत असतेस...

ती : कस सुचत रे तुला ? मला तर वाचूनच छान वाटायला लागलाय , अस वाटतंय खरच लग्न झालाय माझ ...बोल तू मी वाचतेय 

मी : हिरवा बांगड्यांचा चुडा , ओले मोकळे केस , हिरव्या रंगाची सुंदर साडी , गळ्यात मंगलसूत्र , कपाळावरच नुकतच लावलेलं कुंकू अस सर्व पाहण्यात तू स्वतामधेच  हरवून जातेस....

ती : किती मस्त रे .... 

मी : तू स्वतःमध्ये गुंतलेली असतेस ....आणि तेवड्यात तुझा hubby अचानक येतो आणि मागून मिठी मारतो तुला , त्या एक हाथ तुझ्या पोटावरून घरंगळत बेंबी च्या दिशेने जातो आणि दुसऱ्या हाताने तुझा एक हाथ घट्ट पकडून ठेवतो 

ती : अंगावर काटा आला माझ्या ... खूप romantic वाटतंय आता ......

मी : मग पुढे .....

ती : बस .. नको अजून पुढे नाही तर ... माझाच control जाईल ....खूप छान लिहतोस तू ......

मी : कस वाटतंय ?

ती : खूप छान .... तूने एकदम romantic करून टाकलस मला ... पण पुढे नको सांगूस काय झाल ... ते मनातच ठेव 

मी : का ? ऐकायची इच्छा नाही ?

ती : तस नाही ...पण ....समज ना तू आता ...आपण  friend आहोत ....

मी : हाहा हो रे कल्ल .... जा आता झोप रात्र झालीय खूप.....

ती : नको बोल तू दुसर काही ... 

मी : जा झोप .....मस्त romantic स्वप्न बघ...चांगल्या feelings घेऊन झोप 

ती : हो ठीक आहे ... झोपते चल ... bye gn .. thanks 

मी : bye bye good night 

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita