२/११/२०१७

तो दिवस ३ वर्षा आधीचाहळू हळू कळू लागल होत अभिलाषा काही तरी लपवतेय माझ्या पासून, तिच्या वागण्या बोलण्यात तो बदल जाणवत होता मी आधी जास्त लक्ष नाही दिल, पण नंतर जास्तच जाणवायला लागला तिच्यातला तो बदल, लपवायची माझ्या पासून काही तरी, त्या दिवशी भेटली तेव्हा तिच्या मनाची चल-बिचल  स्पष्ट काळात होती, आज नजरेला नजरही भिडत नव्हती,मी विचारलं काय झाल , काही वेळ शांतच राहिली आणि मग बोलली, तुला काही तरी सांगायचं, रागाऊ नकोस,

मी - बोल ना !

ती - एक मुलगा आहे 

मी - समीर ना ?

ती - ( दचकलीच )  तू कस ओळ्खल ?

मी - जस तुला ओळखतो , तस तुझ्या मनतल पण ओळ्खल .... 

ती - बघ ना , आपल तर होऊ शकत नाही ... मग .....

मी - किती महिने झाले तुमच सुरु आहे ...... ???

ती - २ महिने 

मी - मग ?

ती - मग काय ??

मी - आपल नाही होऊ शकत मग तुमच होईल ??

ती - तस नाही पण तो माझ्या जातीचा आहे 

मी - मग त्याचा chance जास्त आहे ?

ती - हो , तस पण नाही जर dad ने परवानगी दिली तर जात आधी बघणार ना 

मी - हा ! बरोबर आहे तुज, तुज future चांगल झाल पाहिजे 

ती - आपण राहूया संपर्कात 

मी - का ? 

ती - i know तुला वाईट वाटतंय 

मी - नाही...... अस काही नाही, तुज चांगल होणार असेल तर मला आनंदच आहे ... 

ती - सांग तुला काय वाटतंय 

मी - बर , वाटल तू सांगितलस तर .. चांगल होईल आता सर्व ... 

ती - तूच बोलण खूप imp आहे माझ्या साठी , कारण तू जास्त ओळखतोस मला 

मी - हो , तुज वाईट तरी नाही बघणार मी , चांगला मुलगा आहे तो , सांभाळेल तुला .... 

(  त्या दिवशी जी मिठी मारली ती प्रेमाची शेवटी मिठी नंतर सुरु झाल तो निव्वळ देवाण-घेवाणीचा खेळ  )

ती - हो ! चल bye नंतर भेटूया कधी तरी ......

मी - bye bye काळजी घे 

( Love can't be found Where it doesn't exist ..      )  

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search