लागणारे साहित्य:
एक कप स्वीट कॉर्न (वाफवलेले),फोडणी देण्या साठी दिड चमचा तेल, पाव चमचा हळद , अर्धा कप कांदा, बारीक चिरून,अर्धा कप टॉमेटो बारीक चिरून, दोन चमचे दही , दोन चमचे क्रीम किंवा साय, दोन वेलची पाव चमचा गरम मसाला,नारळाचे वाटणा साठी अर्धा कप ताजा खोवलेला नारळ, आठ ते दहा काजू , दोन ते तीन हिरव्या मिरच्या, पाच ते सहा लसूण पाकळ्या, अर्धा चमचा किसलेले आलं आणि चवीपुरते मीठ व साखर.
कसे तयार कराल :
सर्व प्रथम नारळाच्या वाटण वाटून घ्यावे.नंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हळद, आणि वेलाचीचे दाणे घालावे आणि कांदा घालून कांदा लाल होई पर्यंत शिजवावे, कांदा शिजला की नारळाचे वाटण घालावे आणि तेल बाहेर येई पर्यंत शिजवावे त्यानंतर टॉमेटो घालून परत शिजवत ठेवावे.ग्रवी थोडी मउ झाली कि दही, साय, गरम मसाला, मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. गर्जे प्रमाणे पाणी घालावे आणि झाकण ठेवून पाच मिनिटे मंद गैस वर शिजवावे.
आणि कॉर्न कोर्मा तयार.
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous