४/२८/२०१७

कॉर्न पॅटीस
लगणारे साहित्य:

दोन कप स्वीट कॉर्न, उकडलेले,तीन ते चार मध्यम बटाटे उकडून घ्यावेत,दोन ब्रेड स्लाईस,एक चमचा आलं किसून घ्यावे,तीन हिरव्या मिरच्या पेस्ट करून घ्याव्यात,दोन लहान कांदे हवे असतील तर,अर्धा चमचा जिरे,थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून,कॉर्न फ्लेक्स, क्रश केलेले प्लेन,एक चमचा मैदा,अर्धा कप पाणी,चवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल

कृती:

आधी बटाटे सोलून कुस्करून घ्यावे,ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून ते बटाट्यात घालावे.

नंतर दीड कप कॉर्न मिक्सरमध्ये वाटावेत. उरलेले अर्धा कप कॉर्न अख्खेच मिक्स करावेत.यामुळे पॅटीस कुरकुरीत होईल त्यानंतर कांदा बारीक चिरून घ्यावा.कॉर्नच्या मिश्रणात कुस्करलेले बटाटे, ब्रेडचा चुरा, मिरची पेस्ट, आले, जिरे, कोथिंबीर, चिरलेला कांदा, आणि मीठ घालावे आणि मिक्स करून घ्यावे.तयार झालेल्या मिश्रणाचे २० ते २२ मध्यम आकाराचे पॅटीस बनवावे. पॅटीस गोल आणि चपटे  बनवावेत. क्रश केलेले कॉर्न फ्लेक्स एका ताटलीत पसरवून ठेवावे.मैदा आणि पाणी यांचे मिश्रण एकदा ढवळून घ्यावे. यात तीन ते चार  पॅटीस बुडवून लगेच बाहेर काढावेत आणि कॉर्न फ्लेक्सवर ठेवावेत. दोन्ही बाजूंनी कॉर्न फ्लेक्स चिकटतील याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे सर्व पॅटीस बनवावेत.आणि त्यांना अर्धा-पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवावे.अर्ध्या तासाने पॅटीस फ्रीजमधून बाहेर काढून दहा मिनिटे बाहेर ठेवावे. कढईत तेल गरम करून मिडीयम गैस वर पॅटीस तळून घ्यावी.तालात असताना पळटण्याची घाईकरू नका त्यामुळे पॅटीस तुटू शकतात. त्यांना थोडे लालसर होईपर्यंत तळावे आणि पुदिना चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.

संदर्भ: facebook share
लेखक :anonymous 

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search