तीन शेवग्याच्या शेंगा लहान तुकडे करून, एक कप बेसन,
अर्धा कप ताजा खोवलेला नारळ,तीन ते चार सुकलेल्या लाल मिरच्या,तीन ते चार कोकमचे तुकडे आणि फोडणीसाठी दोन चमचे तेल, दोन चिमटी मोहोरी, दोन चिमटी जिरे, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद,अडीच ते तीन कप पाणी आणि चवीपुरते मीठ
कसे तयार कराल:
आधी कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग, हळद, आणि लाल मिरच्या अशी फोडणी द्यावी नंतर त्यात कापलेल्या शेवग्याचा शेंगा घालाव्यात आणि नारळ व कोकमही घालावे. गैस मध्यम करून झाकण ठेवून शेंगा शिजू द्याव्यात. वरील झाकणात थोडे पाणी टाकावे. म्हणजे वाफेचे पाणी कढईत ठीबकून शेंगा शिजायला मदत होईल.
चार ते पाच मिनिटांनी झाकणात पाणी उरले असेल तर ते कढईत घालावे. तसेच अजून अडीच कप पाणी आणि मीठ घालून मिक्स करावे. नउ ते दहा मिनिटे उकळू द्यावेत. आता शेंगा शिजल्या आहेत का नाही ते पाहावेत्यांना जास्त शिजू देऊ नये.
एकदा शेंगा शिजल्या कि गैस कमी करून बेसन घालावे.आणि लगेच ढवळावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. सर्व बेसन मिक्स झाले कि नुसते झाकण ठेवून बेसन शिजेस्तोवर वाफ काढावी. या कालावधीत अधून-मधून तळापासून ढवळत राहावे आणि शेवगांच्या शेंगांची भाजीतयार हि भाजी पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करावी.
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous