६/१५/२०१७

चीज पिज करी




लागणारे साहित्य:

एक कप वाफवलेले मटार,दोन  चीज क्युब्ज, लहान तुकडे,तीन  चमचा तेल,तीन ते चार  कांदा बारीक चिरून,अर्धा कप टॉमेटो, बारीक चिरून,तीन ते चार कप ब्राऊन ग्रेव्ही आधी तयार करून ठेवलेली,अर्धा कप काजू-मगजबी पेस्ट आधी तयार करून ठेवलेली,दिड चमचा लसूण पेस्ट,अर्धा चमचा आले पेस्ट,एक चमचा गरम मसाला,दोन  चमचे खवा किंवा एक चमचा मिल्क पावडर,अर्धा चमचा लाल तिखट,पावून कप पाणी,दोन चमचा बटर,चवीपुरते मीठ.

कसे तयार कराल:

आधी काजू-मगजबी पेस्ट करण्यासाठी पाव  कप काजू आणि पाव कप मगजबी पाण्यात घालून उकळून घ्यावे.नंतर पाणी काढून टाकावे आणि त्याची बारीक पेस्ट करावी.कढईत तेल गरम करावे. त्यात कांदा लालसर होई पर्यंत परतवावा. नंतर आले-लसूण पेस्ट घालून परतावी. टॉमेटो घालून एकजीव  होई पर्यंत परतावा. आता उकडलेले मटार घालून मिक्स करावे. २ तव ३  मिनिटे परतून ब्राऊन ग्रेव्ही, काजू पेस्ट आणि गरजेपुरते पाणी घालावे. मंद गैस वर ५ मिनिटे शिजू द्या.त्या नंतर गरम मसाला, खवा, लाल तिखट, बटर, आणि मीठ घालावे. मंद गैस वर ५-६ मिनिटे शिजवावे. सर्व्ह करताना चीजचे बारीक तुकडे घालून करावे. चीज पिज करी तयार. 


संदर्भ: facebook share

लेखक :anonymous


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search