६/१३/२०१७

जुळली हिच्याशी प्रीती,...

जुळली हिच्याशी प्रीती,...

भुर-भुर फिरली-मनात भरली,नार जणू सोंगटी
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||धृ||
डोळ्यापुढून तीला,येता जाताना
असा गमतीचा,हो झोका घेताना
मी पाहिलं तीला,श्वास तुटताना
माझ्या काळजाचा,ठोका चुकताना
मनात रूसली-रूसुन हसली, वार्‍याची हो गती
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||१||
माझ्यासाठी तीला,उभे राहताना
चोरून चोरून तीने,मला पाहताना
मी पाहिलं तीला,डोळे मिटताना
माझ्या डोळ्यात,कचरा लोटताना
कधी ती थंडली-कधी ती तापली,ही मौसमी हो रेती
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||२||
वार्‍यासंगे तीला,पाहिलं वाहताना
माझ्या पाऊलखुणा,तीने मोडताना
मी पाहिलं तीला,मज भीडताना
माझ्यासाठी कधी,तीने रडताना
कधी सुखाची-कधी दु:खाची,ती जाहली सोबती
क्षणात भिजली,भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||३||
पाऊस धारेमधी,तीला भीजताना
हिरव्या शालुमध्ये,आज सजताना
मी पाहिलं तीला,सुख वाटताना
तीच्यामुळं मनी,हर्ष दाटताना
ऊन्हात भाजली-पावसात भीजली,ही भुरभुरणारी माती
क्षणात भिजली-भिजुन थिजली,जुळली हिच्याशी प्रीती...||४||

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा, बीड.
मो. 9730573783
-----------------------------------

* कविता नावासह जशीच्या तशी शेअर करण्यास परवानगी

* सदर कविता पाहण्यासाठी you tube लिंक :-https://youtu.be/4u45gYgsDqU

* कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search