साहित्य
पाव किलो काबुली चणे
२ ते ३ कांदे, (किसून)
४ ते ५ टोमॅटो
चवीपुरता चिंचेचा रस
दोन तमालपत्र
तीन टेबल स्पून तेल
एक टेबल स्पून जिरे
दोन चमचे पादेलोण (काळं मीठ)
दोन चमचे तिखट
अर्धा चमचा गरम मसाला
१ टिस्पून आले पेस्ट
३ लसूण पाकळ्यांची पेस्ट
१ टिस्पून आमचूर पावडर
१ टिस्पून धणेपूड
पाव चमचा हळद
अर्धा चमचा कसूरी मेथी
कोथिंबीर
एक चमचा आले-लसूण पेस्ट
चवीनुसार मीठ
भटूरे
मैदा ४ वाट्या
रवा अर्धी वाटी
दही अर्धी वाटी
मीठ चवीनुसार
साखर एक छोटा चमचा
बेकिंग सोडा पाऊण चमचा
तळण्यासाठी तेल


पाककृती
आदल्या दिवशी भरपूर पाण्यात काबुली चणे भिजत टाकावेत. दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये चणे नरम शिजवून घ्यावेत.
जिरे, काळे मीठ जरा गरम करून बारीक पावडर करावी.
तेल तापवून तमालपत्र टाकून किसलेला कांदा टाकून चांगला नरम करा. आले-लसूण पेस्ट टाकून थोडा वेळ परतावे.
बारीक चिरलेला टोमॅटो टाकून बराच वेळ परतून घ्यावे. कांदा-टोमॅटो एकजीव झाला पाहिजे.
त्यात हळद, तिखट, थोडे मीठ, जिरे व काळे मीठ, धनेपूड टाकून परतून घ्यावे. नंतर शिजवलेले चणे टाकावे.
चणे परतून त्यात एक-दोन वाटया पाणी टाकावे व मंद आचेवर शिजवावे. कोथिंबीर व कसूरी मेथी चुरून टाकावी .
भटुरा
एका भांड्यात मैदा आणि रवा चाळून घ्यावा.
मैद्यात 2 चमचे तेल, मीठ, बेकिंग सोडा, दही आणि साखर घाला.
कोमट पाणी घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे.
भिजवलेले पीठ 2 तास उबदार जागी झाकून ठेवा.
दोन तासांनी कढईत तेल गरम करून घ्या.
लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करून त्याच्या पुऱ्या करून गरम तेलात तळून घ्या.संदर्भ:User Submitted
लेखक : Manali Pawar

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita