६/२१/२०१७

काजूची करी/ उसळ



लागणारे साहित्य:

पाव किलो ओले काजू, वाटणा साठी दोन चमचे ताजा नारळ,थोडीशी कोथिंबीर, थोडेसे पाणी एक चमचा लाल तिखट (चवीनुसार कमी करू शकाता),चमचे तेल,फोडणीसाठी देण्यासाठी २ चिमटी मोहोरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद,एक चमचा चिंचेचा घट्ट पाणी ,चमचे गूळ बारीक करून आणि चवीपुरते मीठ

कसे तयार कराल:

आधी ओले काजू वापरत असाल तर साले काढून साफ करावीत.जर ओले काजू नसतील तर वाळवलेले काजू पाण्यात १०  ते १२ तास भिजत घालावेत.कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी द्यावी. त्यात काजू, मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करावे. गैस मंद ठेवावा. झाकण ठेवून ५ मिनिटे काजू शिजू द्यावेत.काजू खाली कढइला चीताकू नयेन म्हणून एक दोन दा ढवळा,५ मिनिटानी नारळ-कोथिंबीर पेस्ट आणि चिंचेचा पाणी घालावा. २ मिनिटे परतून त्यात पाणी घालावे. झाकण ठेवून काजू शिजू द्यावेत.काजू शिजले कि त्यात गूळ घालून ३-४ मिनिटे मंद गैस वर उकळी काढावी.आणि काजूची उसळ उसळ/ करी तयार हि पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी



संदर्भ: anonymous

लेखक : anonymous





Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search