साहित्य:

४ मूठ जाड पोहे
१ मध्यम कांदा
२ मध्यम आकाराची वांगी
गरम मसाला (चवीनुसार)
लाल तिखट
फोडणीसाठी : मोहोरी, जिरे, हळद, 5-6 कढीपत्ता पाने तेल, चवीपुरते मीठ
१ लहान चमचा साखर
लिंबू
वरून पेरण्यासाठी चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ


पाककृती:

जाड पोहे चाळणीत घालून भिजवावेत. त्यातील पाणी निथळून गेले की त्याला थोडे मीठ आणि साखर लावून घ्यायची. कांदा बारीक चिरून घ्यावा, वांग्याच्या फोडी कराव्यात. कढईत तेल गरम करावे. त्यात त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता घालावा. कांदा घालावा, तांबूस होईस्तोवर परतून घ्यावा. वांग्याच्या फोडी घालाव्यात चांगल्या शिजू द्याव्यात. कांदा आणि वांग्याच्या फोडी शिजल्या की त्यात हळद, तिखट आणि गरम किंवा गोडा मसाला घालावा. भिजवलेले पोहे घालावेत. आणि डावाने निट मिक्स करावे. तेल आणि परतलेला साहित्य सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्यावी. मध्यम आचेवर वाफ काढावी. गरज वाटल्यास थोड्या पाण्याचा हबका मारावा तसेच आवश्यक वाटल्यास मीठ घालावे. काही मिनिटे वाफ काढावी. सर्व्ह करताना पोह्यांवर लिंबू पिळावे आणि वरून चिरलेली कोथिंबीर व खोवलेला नारळ घालावा.

संदर्भ:Facebook share
लेखक : anonymous


Blogger द्वारा समर्थित.