एक मोठा पांढरा मुळा किसून घ्यावा,एक चमचा धणेपूड,अर्धा चमचा जिरेपूड,दोन चमचा तेल,अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट,दोन चमचा कोथिंबीर, बारीक चिरलेली,चवीपुरते मीठ,पाव चमचा ओवा,आवरणाची कणिक,एक कप गव्हाचे पीठ ,एक मध्यम बटाटा, उकडून सोललेला,अर्धा चामचा जिरे,पाव चमचा हळद,अर्धा चमचा मीठ,तेल किंवा बटर पराठे भाजताना
कृती:
आधी कणिक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, उकडलेला बटाटा, तेल जिरे, हळद आणि मीठ घालावे. थोडे पाणी घालून मध्यमसर कणिक माळून घ्यावी आणि २० मिनिटे झाकून लाऊन ठेवावी.
तो पर्यंत पराठ्याचे सारण बनवावे. किसलेला मुळा एका बोलमध्ये घ्यावा. त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे. २० मिनिटात मिठामुळे मुळ्यातील पाणी बाहेर येईल. हे पाणी पिळून बाहेर काढावे. पिळलेला मुळा दुसऱ्या बोलमध्ये घ्यावा. त्यात धने-जिरेपूड, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, ओवा, आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे. तवा मध्यम गैस वर गरम करत ठेवावा. तोवर कणकेचे आणि सारणाचे ६ किंवा ७ मध्यम आकाराचे तुकडे करावे.कोरडे पीठ घेउन कणकेचा एक भाग लहान गोल लाटावा. सारणाचा एक भाग मध्यभागी ठेवावा. कडा सर्व बाजूंनी एकत्र करून सील करावे. कोरडे पीठ घेउन पराठा लाटावा. लाटणे हलक्या हाताने फिरवावे म्हणजे पराठा फाटणार नाही.गरम तव्यावर मिडीयम-हाय आचेवर दोन्ही बाजूंनी पराठा भाजून घ्यावा. भाजताना चमचाभर तेल सोडावे.आणि गरम मुळ्याचा पराठा तयार हा रायते, लोणचे, दही किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावा.
संदर्भ: Facebook share
लेखक : anonymous